नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धरणे आंदोलन


नांदेड : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात तीव्र भूमिका मांडली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.

यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

तसेच, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Leave a Comment

error: Content is protected !!