
लोहा : लोहा शहरातील रोडस्थित जायकवाडी वसाहत परिसरात असलेला पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केल्यानंतर नियोजित बुद्ध विहाराची जागा कायम करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून माजी नगरसेवक अॅड. पंचशील कांबळे यांनी आमरण उपोषण आरंभिले होते. सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिष्टमंडळाशी चर्चा करून सदर जागेवर ‘जैसे थे’ स्थितीचे आदेश देऊन उपोषण मागे घेण्याच्या सूचना दिल्या. सदरील वृत्त समजताच भीमसैनिकांनी मिठाई वाटप करत फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. लोहा शहरातील कंधार
मागील अकरा दिवसांपासून लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत

परिसरातील पंचशील धम्मध्वज प्रकरण धुमसत असताना तसेच पुनर्स्थापित पंचशील धम्मध्वज कायम करण्यात यावा व इतर म ागण्यासाठी प्रमुख आंदोलक माजी नगरसेवक अॅड. पंचशील कांबळे यांनी मागील सहा दिवसांपूर्वी आमरण उपोषण आरंभिले होते.

लोहासह सबंध जिल्हाभर धम्म ध्वज प्रकरण गंभीर होत असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन्ही पक्षकारांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जायकवाडी परिसरातील असलेली सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश (स्टेटस क्को) देण्यात आले. तसेच उपोषणकर्त्याचे उपोषण मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदरील बैठकीतील शिष्टमंडळात भदंत पय्याबोधी, वंचितचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, रवी हटकर, नाम देव बुधे, माणिक ढवळे, भीम कर्तीराज कलंबरकर, छगन हटकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सदरील वार्ता लोह्यात समजताच असंख्य बौद्ध अनुयाया यांनी नियोजित विश्वशांती बुद्ध विहार परिसरात प्रचंड गर्दी केली होती. मिठाई वाटून फटाक्यांची आतीषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी उपोषणकर्ते पंचशील कांबळे यांना ज्यूस देऊन उपोषण सोडविले. यावेळी हजारों बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.