भव्य ‘एकसंध बौद्ध वधू-वर परिचय मेळावा २०२६’ उत्साहात संपन्न


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

कल्याण : बौद्ध समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘एकसंध बौद्ध वधू-वर परिचय मेळावा २०२६’ आज रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी बुद्धभूमी फाउंडेशन अशोक नगर वालधुनी, कल्याण येथे उत्साहात संपन्न झाला.

बुद्धभूमी फाउंडेशन, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती आणि आम्रपाली मंगल वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बुद्धभूमी फाउंडेशन, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती आणि आम्रपाली मंगल वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यास आम्रपाली मंगल वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य सुरेश कटारे गुरुजी, उपाध्यक्ष दत्तू सातपुते तसेच सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात विविध क्षेत्रातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक यांच्यासह विविध क्षेत्रातील युवक-युवतींचा परिचय करून देण्यात आला. तसेच घटस्फोटित, विधुर-विधवा आणि दिव्यांग विवाहेच्छुकांसाठीही परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

प्रत्यक्ष भेटीतून योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी मिळाल्याने सहभागी युवक-युवती व पालकांनी समाधान व्यक्त केले. समाजातील विवाह जुळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!