बाबीर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न.


प्रतिनिधी: सागरभाऊ लोंढे 

आवाज वंचित बहुजनांचा न्यूज..

रुई ता. इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा संपन्न झाली

  यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले अनुभव विशद केले. यामध्ये आरोही पांढरमिसे, स्वरा पांढरमिसे, जानवी अवघडे, स्वरा खंडोजी खरात, यश अजिनाथ मारकड, तेजल रामदास लवटे, जोया मुलाणी, श्रावणी पांढरमिसे, योगिता रणसिंग, प्रगती मारकड, साक्षी सोनवले, वैष्णवी दगडे, राजश्री शिंदे, तृप्ती लावंड आणि उर्मिला शिंदे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये गुरुबद्दल असणारा आपला आदर आणि प्रेम विशद करत खूपच छान मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, शिक्षिका मीरादेवी पाटील,दत्तात्रय जाधव यांनीही खूपच पौराणिक इतिहासाची दाखले देत सखोल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमीन मुल्ला यांनी केले तर आभार पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी मानले.


Leave a Comment

error: Content is protected !!