बाबीर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश



प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे
आवाज वंचित बहुजनांचा

इंदापुर :रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 51 विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल काल दिनांक 27 जुलै रोजी विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी सर्व विद्यार्थी व गुरुकुलच्या सर्व टीमचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. हे यश विद्यार्थ्यांनी कष्टाने मिळाल्याचे सांगितले. या सत्कार समारंभास विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे, विद्यालयाच्या शिक्षिका मीरादेवी पाटील, प्रतीक्षा पाटील, शिक्षकेतर संघटनेचे दत्तात्रेय काळे सर्व शिक्षक – शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी गुरुकुलच्या ललिता लवटे, योगिता जाधव,संजना लावंड,अक्षय मारकड, विवेक पाठक, किसवे मॅडम,शालन मारकड मॅडम, यांचाही यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी गावडे यांनी केले तर आभार सुनील दराडे यांनी मानले.


Leave a Comment

error: Content is protected !!