हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना मध्यरात्री भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के; घाबरू नका, सतर्क राहा – प्रशासनाचे आवाहन Nanded


नांदेड : हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यामधून आज दिनांक 09 जुलै 2026 रोजी 01:37 मी., 02:15 मी. व 02:17 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली 

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.6, 3.6 व 3.9 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

 

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. 

 

सदर भूकंपाचे धक्के हे मध्यरात्री जाणवले आहेत. धक्के बसले तेंव्हा बरेच लोक झोपेत होते. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के जाणवले असल्यामुळे सकाळपर्यंत अजून धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमावे. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!