डोंगरगाव येथील बौद्ध विहारासमोर घाण पाण्याचा विळखा; वंचित बहुजन आघाडीची तात्काळ कारवाईची मागणी


 

कळमनुरी : गाव.डोंगरगाव, ता. कळमनुरी

पंचायत समिती कार्यालय, ता.कळमनुरी,जि. हिंगोली.

डोंगरगाव नाका येथील बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत च नाल्याचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून तात्काळ कारवाई करण्याची मा. गट विकास अधिकारी, प.स यांना दिले निवेदन.

 

डोंगरगाव नाका येथील गावामध्ये बौद्ध विहार असून, विहारासमोर समाजाच्या वापरासाठी मोकळी जागा आहे. सदर जागेवर समाजबांधवांकडून विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून चंपत काळे व सविताबाई शिरफुले यांच्या घरातील नाल्याचे घाण व दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असून, बौद्ध विहारासमोरील परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे,याबाबत कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्याकडे महिलांनी तक्रार केली होती.

 

याबाबत त्वरित दखल घेऊन गट विकास अधिकारी,पंचायत समिती कळमनुरी यांच्याकडे तक्रार दाखल केली.

सदर घाण पाण्यामुळे डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः बौद्ध विहारासारख्या धार्मिक व सामाजिक स्थळासमोर अशा प्रकारे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी साचणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे.

 

याबाबत संबंधित चंपत काळे व सविताबाई शिरफुले यांना वारंवार तोंडी सांगून तसेच घाण पाणी बंद करण्याची विनंती करूनही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिणामी, दिवसेंदिवस परिसरातील अस्वच्छता वाढत असून नागरिकांना व समाजबांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

तरी मा. साहेबांनी सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. चंपत काळे व सविताबाई शिरफुले यांच्या घरातील नाल्याचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत.

 

तसेच बौद्ध विहारासमोरील परिसराची तात्काळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून संबंधित व्यक्तींना घाण पाणी सार्वजनिक व धार्मिक परिसरात सोडण्यास प्रतिबंध करावा. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही यासाठी संबंधितांवर नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, ही आमची नम्र परंतु ठाम मागणी आहे.

 

अन्यथा, या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका अथवा अनुचित घटना निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व जबाबदार व्यक्तींवर राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

 

आमच्या प्रमुख मागण्या :

 

सदर ठिकाणाची तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी.

 

बौद्ध विहारासमोर येणारे घाण व दुर्गंधीयुक्त सांडपाणी तात्काळ बंद करण्यात यावे.

 

सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कायमस्वरूपी योग्य व्यवस्था करण्यात यावी.

 

बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेची तात्काळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

 

वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी,असे तक्रारी निवेदन देण्यात आले. यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू कांबळे,युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम,युवा ता.महासचिव दिनेश पाईकराव,युवा कार्यकर्ते राजे रणवीर व समस्त बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

 

वंचित बहुजन युवा आघाडी, ता. कळमनुरी. जि. हिंगोली


Leave a Comment

error: Content is protected !!