महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाजपरिवर्तनासाठी सज्ज व्हा -दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष वंचित


(जालना प्रतिनिधी )

जालना : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील बोरगांव येथील बौद्ध विहारा समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना व्यक्त केला आहे.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, दिलीप मगर डिगांबर गोरे, गणेश कांयदे, बद्रीनाथ नंदाजी कायंदे, आनंद लोंढे, सचिन लोंढे,वाघाजी डोके,सारंगधर डोके, मच्छिंद्र डोके, गणेश सुकदेव डोके मदन डोके, संजय डोके, अनिल डोके, दिनकर डोके,बाबासाहेब वामनराव डोके, दिपक दत्ता डोके,किरण एकनाथराव डोके,महेंद्र नामदेव डोके, आनंद लिंबाजी डोके, निलेश डोके,किरण धर्माजी डोके, मुक्ताबाई डोके, यमुनाबाई डोके, तारामतीबाई डोके,शिवगंगा पाडमुख, विमलबाई डोके,वर्षा डोके, सविता डोके,शिलाताई हिवाळे,आरती हिवाळे, आकांक्षा डोके यांच्या सह मोठ्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!