वंचित बहुजन आघाडी तसेच युवाआघाडी यांच्या संयुक्त विध्यमाने, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन


  अहमदनगर | ११ एप्रिल २०२६
श्रीरामपूर तालुक्यातील फुले-आंबेडकरनगर (दत्तनगर) येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेच्या वतीने ‘शिक्षणाचे जनक’ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या वारशाचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या अभिवादनाने झाली. युवाआघाडी महासचिव सुनिलभाऊ वाघमारे आणि तालुका संघटक योगेशभाऊ घोडके यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या रोहिणीताई कटरणवरे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी न्यायाचा लढा दिला, त्यांच्या या महान कार्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.


या अभिवादन कार्यक्रमाला परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने मारियाताई कटारणवरे, बेबीताई घोडके, रमा शिंदे, दिक्षा शेलार, सुमन दुशिंग, कांता कदम, सुजाता उबाळे, मीना साळवे, बेबी चाबुकस्वार, सोनाली खरात, आशा पारखे, माया गायकवाड.
व पंचक्रोशीतील प्रतिष्टीत नागरिक सुखदेवदादा त्रिभुवन, इम्रानभाई शेख, तसेच राहुल गायकवाड, तेजस कटारणवरे, चेतन गायकवाड, नाना शिंदे, रविराज शिनगारे, विलास दुशिंग, लक्ष्मण खरात, विश्वास पारखे, बाळू खरात, रतन पारखे, दत्तू खरात, रमेश त्रिभुवन.
या सर्वांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला. दत्तनगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.


Leave a Comment

error: Content is protected !!