शिरूर (मुखेड) येथे कवी संमेलन उत्साहात संपन्न


प्रतिनिधी बळीराम कांबळे

शिरूर (मुखेड) येथे “कवी संमेलन”दिनांक ११/०४/२०२६ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व दिनांक १४/०४/२०२६रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

अशा दोन्ही जयंतीच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा व. वंचित बहुजन आघाडी मौजे

शिरूर (मुखेड) ता.मुखेड

जि.नांदेड यांच्या वतीने चार दिवस भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी दिनांक ११/०४/२०२६

रात्री ठीक ८.०० वाजता

कवी संमेलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी‌.जी.भद्रे सर् यांनी केले तर चंद्रकांत गायकवाड सर् यांनी 

कवी संमेलनाचे उद्घाटन

झाल्याचे जाहीर केले.

ॲड तानाजी मालुसरे वर्ताळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली तर

यावेळी ख्यातनाम कवी

यशवंत कांबळे सर् बावलगावकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगणारी कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

चंद्रकांत गायकवाड सर् यांनी “प्रतिक्रांती “.

ही रचना सादर करताना

कवितेच्या भावार्थास हात घातला,संचलनाची धुरा अगदी संतुलनात्मक पद्धतीने सांभाळून एका खेडेगावातील लोकांना कविता कशी आपली वाटेल यासाठी खिळवून ठेवले.पी.एल.दाडेराव सर् यांनी आपल्या अस्सल ग्रामीण बोलीभाषेत काव्यरचना सादर करून एक काव्यमय वातावरण निर्माण केले.

डी जी ढवळे सरांनी तर

गेय पद्धतीने आपल्या रचना सादर करताना परिसरातील माणसांना अगदी बुडातून ढवळून काढण्यात यशस्वी ठरले.

बी.एस.कांबळे सर् उर्फ बळी गुरूजी दिग्रसकर यांनीही अज्ञानी आणि भोळ्या भाबड्या लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कसे बाहेर आले पाहिजे यावर

कवितेच्या माध्यमातून सडेतोड मांडणी केली.

याप्रसंगी ॲड संजय भारदे साहेब यांनी मोघम

पद्धतीची मनुस्मृती वर प्रकाश टाकताना तिचे अवगुण लोकांसमोर स्पष्ट केले.

अध्यक्ष ॲड तानाजी मालुसरे वर्ताळकर यांनी आपली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या या विषयावर आपली रचना सादर करताना, चौफेर वैचारिक उधळण केली.

पी जी भद्रे यांच्या आभाराने कार्यक्रमाचा भार उतरवला.

या बहारदार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व उपासक उपासिकांनी टाळ्यांच्या गजरात कवी संमेलन यशस्वीतेसाठी सहभागी होऊन सहकार्य केले.

चार दिवस सुरू असलेल्या या धम्म जागरास उपस्थित राहावे म्हणून ॲड संजय भारदे साहेब……..

यांनी पोटतिडकीने सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले


Leave a Comment

error: Content is protected !!