ता. कळमनुरी. सुरू असलेले काम बंद करताच तातडीने साफ सफाईला सुरुवात


तालुका कळमनुरी (प्रतिनिधी ) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसाबाबत निष्काळजी पना सहन करणार नाही..!

काम करणाऱ्या गाडीवर अवैध ड्रायव्हर लायसन्स नसलेल्या गाडींना तक्रारी नंतर आरटीओ विभागाकडून काँक्रिट मिक्सर 14 हजार तर JCP यांना 6 हजाराचा फाईन शासकीय रुग्णालयाच्या इमारत बांधकामामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसर धुळीमुळे खराब होत असल्या कारणाने आक्रमक भूमिका घेताच पुतळा व परिसर याचीं तातडीने साफ सफाई करून घेण्यात आली.

कळमनुरी शहरात असलेले शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे औषधी भांडार इमारतीचे बांधकाम सुरू आहे,या होणाऱ्या कामामुळे कामातून होणारी डस्टच्या धुळीमुळे परिसरात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व त्यांचे परिसर अत्यंत घाण होते.

वारंवार सांगून सुद्धा रुग्णालयातील अधिकारी व pwd विभाग दखल घेत नसल्यामुळे आज प्रत्यक्ष कामावर भेट देऊन सर्व काम बंद करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सुरू असलेले काम थांबवल्यामुळे त्वरित सदरील कॉन्ट्रॅक्टदार यांनी पाण्याचे टँकर बोलावून सर्व पुतळा व सर्व परिसराची साफसफाई करून घेतली तसेच पुतळ्यावरती यापुढे धूळ जाणार नाही यासाठी कापडी ताडपत्रीने आजूबाजूचे परिसर सुद्धा झाकून नियोजन करण्यात आले. तसेच सदिल कामावरती इन्शुरन्स नसलेल्या गाड्या कामाला होत्या याबाबत अपघात झाला तर याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा मुद्दा समोर आल्यानंतर आरटीओ विभागाला त्वरित तक्रार केल्यानंतर आरटीओ विभाग यांनी त्वरित ठिकाणी भेट देऊन गाडी काँक्रिट मिक्सर 14 हजार तर JCP यांना 6 हजार फाईन लावण्यात आला.यापुढे सदरील कामाच्या धुळीमुळे परिसर घाण होणार नाही आणि झाले तर रोज पाणी टाकून साफसफाई सदरील कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून करून घेण्यात येण्याची आश्वासन देण्यात आले, तसेच यापुढे परिसर घाण झाले नाही पाहिजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आक्रमण करून सांगण्यात आले आणि हा निष्काळजी पना यापुढे झाला यासाठी असणारे जबाबदारांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी यापुढे करू असे सदरील विभाग व कॉन्टॅक्टदार यांना सांगण्यात आले. 

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे मा.ता.अध्यक्ष राजू कांबळे, युवा ता.अध्यक्ष मोहम्मद असलम, कार्यकर्ते अँड. रतन बलखंडे , समाधान पाईकराव उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!