
जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर.
बारूळ : अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचा उंबरठा सहज ओलांडता येतो. परिणामस्वरूप विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेचा कस लागतो आणि यशाच्या शिखरावर प्रयत्नांच्या लेखणीने स्वतःचे नाव कोरता येते याचा उदाहरण म्हणजे श्री शिवाजी विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या कु काशवी वाघमारे , कु जिज्ञासा वाघमारे, कु समीक्षा इटकापले पंकज नवघरे गोविंद कांबळे या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार पुरस्कृत NMMS अथित( नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ) ही आठवीत शिकणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल हुशार विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. ज्यामध्ये ह्या पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत भरीव गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक कार्यालय प्रमुख सर्व शिक्षक शिक्षिका यांच्यातर्फे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार घालून अभिनंदन करण्यात आले.