आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या वर्षी विज्ञान वारीत नांदापूर शाळेचा झेंडा 🎖️🏆


नांदापूर :-दिनांक 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या विज्ञान वारी जिल्हास्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदापूर येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कुमारी अंजुषा केशव चव्हाण व कुमारी प्रणाली सुनील पतंगे या दोघी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत त्यांची आयुका पुणे येथे निवड झाली आहे.
ही बाब शाळेसाठी तसेच केंद्रासाठी अत्यंत अभिमानास्पद असून सलग दुसऱ्या वर्षी नांदापूर शाळेने विज्ञान वारी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख जे. एम. व्यवहारे सर, मुख्याध्यापक भुरके सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायकराव बोरकर, वर्गशिक्षक धुळे सर, गुंजकर सर, विज्ञान शिक्षिका कु. एकोणकर मॅडम, सूर्यवंशी सर, कल्याणकर सर, श्रीमती नाईकवाडे मॅडम, व्यवहारे सर आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
दोन्ही विद्यार्थिनींना विज्ञान वारी परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका कु. एकोणकर मॅडम यांनी केले.
🌟 अंजुषा चव्हाण व प्रणाली पतंगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आयुका पुणे येथील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟


Leave a Comment

error: Content is protected !!