
प्रतिनिधी : बळीराम कांबळे
ता. जळकोट.जि. लातूर प्रति वर्षी प्रमाणे पिताश्री रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय व माता गिरीजा जी एन एम नर्सिंग कॉलेज हळदवाढवणा ता. जळकोट येथे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य सन्माननीय संजय रावसाहेब पाटील जाधव तसेच प्राचार्य माधव गवालेसर.

यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी दिपाली व रूपाली गवळे या विध्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला यानंतर स्वराज जाधव या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चारित्र्यावर भाषण केले व नेहा कुंडगीर या विध्यार्थिनीने शिवरायांचे गीत सादर केला.

यावेळी यमलवाड सर. नामवाड सर.कांबळे सर. जाधव सर.भाजीपाले सर.गुजरे सर.ओंकार सर.राठोड सर. वाघमारे मॅडम.खेडे मॅडम. यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्यालयास लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा विद्यालयास भेट दिली
नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य गवाले सर यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांचे मनो जिंकले
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी ढवळे तर आभार प्रदर्शन संस्कृती सोनकांबळे या विध्यार्थीनिने केले.