तालुका अध्यक्ष राजू कांबळे हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांची भेट; 26 फेब्रुवारीला VBA चा धरणे आंदोलना इशारा


नांदेड.हल्ला प्रकरणी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांची भेट,26 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन…! कळमनुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयमध्ये शिरून अज्ञान व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता,सदरील घटनेला 10 दिवस उलटले असून सुद्धा हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून योग्य तो तपास केला गेला नसून अद्यापही हल्लेखोर फरार आहेत.

हल्ला करणारे हल्लेखोर अद्यापही सापडले नसून जीवित्वाचा धोका टळला नाही,यामुळे 18 फेब्रुवारी 2026 रोजी कळमनुरी पोलीस निरीक्षक व मेल द्वारे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांना धरणे आंदोलनाचे निवेदन दिल्यानंतर सुद्धा तपासला वेग आला नसल्या कारणाने आज रोजी नांदेड विशेष पोलिस उपमहानिरीक्षक येथे भेट घेऊन येत्या 2 दिवसात हल्लेखोर न सापडल्यास 26 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय,नांदेड समोर धरणे आंदोलनचा इशारा दिला आहे. 

 

यावेळी नांदेडचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजभाऊ अटकोरे, जि.महासचिव दीपक मगर, जि.उपाध्यक्ष के.एच.वने, जि.सचिव बालाजी सावंत, अर्धापूर मा.ता.अध्यक्ष बंटी मोरे, कळमनुरी मा.ता.अध्यक्ष राजू कांबळे ,युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम, दिनेश पाईकराव, समाधान पाईकराव व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!