नांदेड जि (प्रतिनिधी) सूर्यकांत वाघमारे बारूळकर
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित नरसिंह विद्यामंदिर या केंद्रावर दहावी शालांत परीक्षा सुरळीतपणे सुरू आहेत.या केंद्रावरील परीक्षार्थी व त्यांच्या पालकांनी राबविण्यात येत असलेल्या काॅपीमुक्ती अभियानास पुर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे.

विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर तोतया पत्रकार सखाराम कुलकर्णी हा या केंद्रावर मोठ्या रकमा घेऊन परीक्षा केंद्रावर काॅपी चालवण्यासाठी आटापिटा करत कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होता पण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी कुठलाही दबाव न घेता पोलिस आणि शिक्षण खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मदत घेऊन संबंधितांचे गैरकारभार करण्याचे मनसुबे उधळून लावले आहेत.सदरील परीक्षा सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरू असल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यामुळे होतकरू विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.