
कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
बदलापूर, दि. 21 फेब्रुवारी 2026 — बदलापूर शहरात भीम महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन प्रवीण भाऊ राऊत यांनी केले होते.

कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या वेळी नगर पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मंजुषा शिंदे, कडुबाई खरात, राखी चौरे, प्रबुद्ध जाधव आणि सरकार म्हणजे दिव्या शिंदे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
संपूर्ण परिसर भीम गीतांनी आणि जयभीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध आयोजन याबद्दल आयोजक प्रवीण भाऊ राऊत यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

