
प्रतिनिधी : प्रकाश गवारे
बुद्ध विहार समिती, पूर्णा (रजि.) यांच्या वतीने २३ वी बौद्ध धम्म परिषद भव्य व ऐतिहासिक स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद स्मृतिशेष भदन्त उपाली थेरो यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच त्यांच्या चैत्याच्या उद्घाटनप्रसंगी संपन्न होणार असून, हा सोहळा बौद्ध धम्म चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद
शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ व
रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६
या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
परिषदेचे आयोजन बुद्ध विहार, भदन्त उपाली थेरो नगर, पूर्णा, ता. पूर्णा, जि. परभणी (महाराष्ट्र) येथे करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी दक्षिण कोरिया येथील नामवंत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध भिक्षू व उपासकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये
उपासक यम-ज्युंग हो (माजी आंष्टीबाट महोत्सव, कोरिया),
उपासक जंग सुंगीर (माजी सरचिटणीस, डोंगवासा टेम्पल, दक्षिण कोरिया),
उपासक किम डॉग ग्वे,
उपासिका अन नागियम,
भदन्त डॉ. ली. ची. रेंन व
भदन्त वॉनमीएन्ग
(सर्व – दक्षिण कोरिया)
यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेमध्ये बौद्ध धम्मावरील सखोल प्रवचने, धम्म मार्गदर्शन, स्मृतिशेष भदन्त उपाली थेरो यांना अभिवादन, स्मृतिपूजन तसेच त्यांच्या चैत्याचे उद्घाटन असा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. भदन्त उपाली थेरो यांनी आयुष्यभर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवून ही परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या ऐतिहासिक परिषदेसाठी महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतील तसेच देश-विदेशातील धम्मबंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बौद्ध धम्मातील आंतरराष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही परिषद पूर्णा शहरासाठी गौरवाची बाब ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
बुद्ध विहार समिती, पूर्णा यांनी सर्व धम्मबंधू, नागरिक व समाजबांधवांना या २३ व्या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

