
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
थार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘आनंद नगरी’ या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात विविध प्रकारचे चविष्ट व मनसोक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. आनंद घेता-घेता, आनंदी राहून मनसोक्त खाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. शैक्षणिक वातावरणात प्रौढ महिला व पुरुष यांनी खेळामध्ये सहभाग घेतला.आनंद, खेळ, सहभाग आणि सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
‘आनंद घेऊया, आनंदी राहूया, मनसोक्त खाऊया’ या ब्रीदवाक्याखाली पार पडलेल्या आनंद नगरी उपक्रमामुळे शाळेचे परिसर आनंदाने फुलून गेला. शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.




