
श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस (बु) चे शिक्षक तुकाराम कारागीर सेवानिवृत्त, संस्थेसह परिसरातील आजी माजी विद्यार्थ्यांनी केला यशोचित सत्कार
ता कंधार प्रतिनिधी बळीराम कांबळे
येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस ( बु) येथील विज्ञान विषयाचे शिक्षक तुकाराम कारागीर हे तब्बल ३० वर्ष प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार शनिवारी दि३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले

यावेळी विद्यालयाच्या वतीने आशीर्वाद गार्डन येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सह सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्रा, डॉ पुरुषोत्तम धोंडगे
शालेय समिती चे अध्यक्ष विश्वंभर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस बोंडावर पर्यवेक्षक बी डी होनराव गावातील प्रतिष्ठीत नागरिक व आजी माजी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापक बोंडावार यांनी प्रास्ताविक करताना कारागीर गुरुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेचे सचिव प्रा, डॉ पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले की तुकाराम कारागीर यांनी गावकऱ्यांसह मने जिंकली आणि ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी घडवून आपल्या विघालयात शालेय विद्यार्थ्यांच्या जीवन घडणातील वैज्ञानिक शब्दाचा कारागीर, म्हणून कारागीर सरांचा गौरव केला तब्बल ३० वर्ष मध्ये कुरुळा, कंधार आणि दिग्रस ( बु) येथे आपली सेवा बजावली पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या

सत्काराला उत्तर देताना कारागीर गुरुजींनी संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ भाई केशवरावजी धोंडगे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष भाई गुरुनाथराव कुरडे आणि धोंडगे परिवाराने मला संस्थेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केलेव सुत्र संचालन बी डी होनराव गुरुजींनी करुन उपस्थितांचे. आभार मानले