राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप उत्साहात


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतूर संचलित स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार 7 दिवसीय शिबिराचा आज समारोप समारंभ पार पडला.

आजच्या या शिबिराचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच आजच्या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र गायके वैद्यकीय अधिकारी, मंठा हे उपस्थित होते. डॉ. कमळकर सर, उप प्राचार्य, श्री. देशमुख सर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक, सावरगाव वायाळ, श्री. रमेशराव वायाळ, उप सरपंच, सावरगाव वायाळ, डॉ. वसंत जागृत, डॉ. विनायक काळे सर, डॉ. गजानन मुळे सर, डॉ. भारत धोत्रे सर, डॉ. विशाल अवसरमोल सर, डॉ. दक्षता देशमुख मॅडम, यांनी उपस्थिती लावली. तसेच स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय चे सर्व प्राध्यापक व शिक्षककेतर कर्मचारी हे उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!