
शेवगा (परतूर प्रतिनिधी – दीपक नाटभजन) :
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगा येथे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बालविवाह विरोधी शपथ घेत समाजात जनजागृतीचा संदेश दिला.
कार्यक्रमात बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्यावर गंभीर परिणाम होतो, याची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “बालविवाह करणार नाही आणि समाजात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करू” अशी शपथ घेतली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून बालविवाह मुक्त समाजासाठी सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमास गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेवराव धुमाळ, उपाध्यक्ष प्रल्हाद धुमाळ, सरपंच विक्रम धुमाळ, उपसरपंच सत्यवान धुमाळ, पोलीस पाटील विजय गुलाबराव नाटभजन, ग्राम रोजगार सेवक विठ्ठलराव धुमाळ, रिटायर आर्मी सोपान तात्या धुमाळ, काशिनाथराव धुमाळ, श्रीरंग धुमाळ, कल्याण धुमाळ, परसराम संजय धुमाळ, पांडुरंग धुमाळ, नितीन धुमाळ, रामेश्वर धुमाळ, गजानन धुमाळ, सोमनाथ धुमाळ, योगेश वरकड, वैभव धुमाळ, सतीश धुमाळ, परमेश्वर शिंदे, दत्ता धुमाळ, मदन धुमाळ, मारुती धुमाळ, आतिश धुमाळ, योगेश धुमाळ, विष्णू मुजमुले, रामजी वरकड, हिमालय वर्कर यांच्यासह शाळेतील शिक्षक कुलथे सर, माहुरे सर, सावंत सर उपस्थित होते.




