
बीड : बीडमध्ये एक अत्यंत चीड आणणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.
पीडित कुटुंबाने काल माझी भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी आरोपींनी पीडित कुटुंबियांना धमकी देऊन पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपी कुंडलिक खांडे, गणेश खांडे यांच्यासह इतरांना सहआरोपी करावे, असे निर्देश डीवायएसपी पूजा पवार यांच्याशी संपर्क करून दिले. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशीही मागणी केली.
या प्रकरणी पीडितांना न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढा आणि सर्वतोपरी सहकार्य वंचित बहुजन आघाडी देईल. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोग, राज्य महिला आयोग आणि मानवाधिकार आयोगात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तक्रार दाखल करण्यात येणार आहे.