नांदेड येथे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; ‘एल्गार विद्रोहाचा, विचार समतेचा’चा बुलंद नारा


नांदेड : “एल्गार विद्रोहाचा, विचार समतेचा… आम्ही सारे विद्रोही” या घोषवाक्यासह २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान सायन्स कॉलेज ग्राउंड, नांदेड येथे हे संमेलन उत्साहात पार पडणार आहे.

 

साहित्य, कला आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा संगम घडवणारे हे संमेलन विद्रोही परंपरेला पुढे नेणारे ठरणार आहे. संमेलनात मराठी स्टँडअप कॉमेडी, हृदय कला दालन, नाट्य अभिवाचन, एकपात्री प्रयोग, गझल संमेलन, कवी संमेलन, एकांकिका, कथाकथन, परिसंवाद, रॅप साँग, गटचर्चा आणि नाटक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

 

समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संमेलनात विद्रोही विचारांची सशक्त मांडणी केली जाणार आहे.

 

नांदेडकरांनी या साहित्यिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!