नावडे पेंधरफाटा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश हिंदुत्व आणि आंबेडकरी विचारधारा एकाच मंचावर


पनवेल : महानगरातील नावडे पेंधरफाटा येथे भाजपा कार्यकर्ते शिवभक्त श्री. नितीन धनंजय राय यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी नावडे शहर अध्यक्ष आयु. संदेश लहू घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

श्री. नितीन राय यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आणि विचारधारेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत पक्ष प्रवेश केला.

ते म्हणाले, “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर चालत समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत राहीन.”

 

यावेळी नावडे शहर अध्यक्ष आयु. संदेश घाडगे यांनी त्यांची नावडे शहर उपाध्यक्षपदी निवड केली.

निवड झाल्यानंतर श्री. राय यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

कार्यक्रमानिमित्त श्री. नितीन राय यांच्या वाढदिवसानिमित्त नव्याने उभारलेल्या शिव मंदिराचे लोकार्पणही करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये –

नावडे शहर कार्यकारिणीचे सदस्य:

आयु. आनंद ज्ञानदेव खरात (महासचिव), आयु. अरबाज पटेल (सचिव), आयु. राजेश सुरेश म्हात्रे (कोषाध्यक्ष), संघटक इकबाल शेख, सदस्य नरेश नटराज धोत्रे, फैजल खान, राकेश चंद्रिका चौहान, निलेश लहू घाडगे, साहिल जाधव, आकाश घाडगे आदींचा सहभाग होता.

 

कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड, उपाध्यक्ष शशिकांत कळवेकर, महासचिव अविनाश अडागळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, कुमार मेंटागे सर, psi अनिल शिंदे साहेब, तसेच अनेक आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या उपाध्यक्ष नितीन धनंजय राय यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 


Leave a Comment

error: Content is protected !!