रमाई सभागृह परिसरातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नांवर वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक; निवेदनानंतर तात्काळ नालेसफाई


प्रतिनिधी शेख हसन

ता.खामगाव : दिनांक 7/5 /2026 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले

गेल्या तीन ते चार महिन्यापासून रमाई सभागृहाच्या जवळील बऱ्याचशा घरातील नळांना पाणी येत नाही त्यामुळे पाण्याची समस्या अगदी बिकट झालेली आहे आम्ही दर वेळेस वेळेवर टॅक्स भरून सुद्धा जर पाणी येत नसेल तर नगर परिषद मधील कर्मचारी काय कामाचे? म्हणून त्वरित आपण दखल घेऊन सर्व नळांना पाणी येईल याची दक्षता घ्यावी तसेच1) नगरपरिषदे ने जो वाढीव टॅक्स दिलेला आहे तो कमी करण्यात यावा

2)रमाई सभागृहाच्या समोर गेट समोरील नाली बुजवण्यात यावी

3)प्रभाकर वाकोडे यांच्या घरासमोरील कॉर्नरला दोन्ही खांबावर एकच लाईट आहे एका बाजूने अंधार पडतो म्हणून दोन्ही खांद्यावर एक एक लाईट लावण्यात यावा

4)रमाई सभागृहाच्या मागच्या गेटमध्ये हॅलोजन लाईट बसवण्यात यावे

5) काही दिवसापासून रमाई सभागृहातील हॅलोजन लाईट बंद पडले ते दुरुस्त करण्यात यावे

6)सरकटे ते पाटील यांच्या घरासमोरील नाली कधीही साफ करण्यात येत नाही तरी ते साफसफाई करण्याकरता माणसे पाठवण्यात यावी ह्या मागण्या आम्ही केल्या होत्या त्यामधील सहाव्या मागणीला त्वरित यश आले आणि पाच वाजता नगरपरिषदेने नालेसफाईसाठी कर्मचारी पाठवले हा वंचित बहुजन महिला आघाडीच्या निवेदनाचा परिणाम आहे वरील मागण्या सुद्धा त्वरित पूर्ण होतील अशी अपेक्षा या निवेदनावर खालील विशाखाताई सावंग, आशाताई गवई, संघमित्रा भैसारे, रेखाताई लोखंडे, भारतीय वाघमारे, निर्मला वानखेडे पंचशीला पवार इत्यादींच्या सह्या होत्या


Leave a Comment

error: Content is protected !!