कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं.स. निवडणुकीची वंचितकडून तयारी


कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं. स.मधील ईच्छुकांनी अर्ज करावे – (VBA ) कंधार तालुका अध्यक्ष : संतोष पाटील गवारे, (VBA) कंधार महासचिव रुपेश कांबळे

कंधार प्रतिनिधी:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं.स. सहा जिल्हा परिषद सर्कल व बारा पंचायत समिती गणातून वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवू ईच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपला कार्यअहवाल व अर्ज करण्याचे आवाहन वंचित बहूजन आघाडीचे कंधारचे वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे व महासचिव यांनी केले आहे.

 

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहूजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष

 

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने या भागातील अनेक तरूण कार्य करत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला लक्षवेधी असे मतदान झाले आहे. याच बळावर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती कंधार नगरपालिका वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्या अनुषंगाने कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ईच्छूक उमेदवारांनी आपला कार्यअहवाल व आपली माहिती वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष व महासचिव यांच्याकडे. देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एकंदरीत विविध पक्षाकडून या भागातून निवडणुकीची तयारी सुरू असतांना आता वंचित बहूजन आघाडीकडूनही ईच्छूक उमेदवाराकडून अर्ज मागणी केल्याने आगामी निवडणूक वंचित बहूजन आघाडी सर्व ताकतीनिशी मैदानात उतरेल असे चित्र दिसून येत आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!