रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सासूबाईंचे निधन; अंत्ययात्रेसाठी आंबेडकर कुटुंबीयांची उपस्थिती


मुंबई:रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या सासूबाई व मा. मनीषा आनंदराज आंबेडकर यांच्या मातोश्री प्रेमाआई पांडुरंग साळवी यांचे आज, दि. १० डिसेंबर २०२५, अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साळवी कुटुंबीयांसह आंबेडकर परिवारावर शोककळा पसरली आहे.

अंत्यविधीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच आंबेडकर कुटुंबीय उपस्थित राहून प्रेमाआईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.


विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, संपूर्ण दक्षिण जिल्ह्याच्या वतीने प्रेमाआईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!