कंधार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न


कंधार : कंधार येथे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.शंकरराव महाजन, जिल्हा महासचिव मा. रवि पंडित यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये दि.२१/१/२०२६ रोज बुधवारी कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तेंव्हा कंधार तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग च्या आजी माजी कार्येकर्ते,पदाधीकारी,समन्वयक यांनी बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते.

या बैठकीला जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष गणपत सवईसोनकांबळे उपाध्यक्ष अरुण भद्रे, सचिव रघुनाथ गजले, संघटक संजय टिके, सल्लागार डॉ. रामचंद्र वंनजे, सल्लागार भगवानराव हनुमंते, कायदे सल्लागार ॲड जयपाल ढवळे, प्रसिद्धी प्रमुख नामदेव पांचाळ, सुरेश गजभारे जिल्ह्यातील काही पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. आपले हेवेदावे सोडून द्यावे. असे मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्ष भाषण करताना जिल्हाध्यक्ष मा .शंकर महाजन यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष बनवले. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुका लढवायच्या आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामला लागावे. तसेच संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्याची चाचपणी केली. लवकरात लवकर तालुका बॉडी जाहीर केली जाईल असे आश्वासन पण दिले. कार्यकर्त्यांनी नाराज न होता बाळासाहेबांचा सैनिक म्हणून पक्षासाठी काम करावे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचेच उदाहरण म्हणून गेल्या नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. असे सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे माजी महासचिव रुपेश कांबळे यांनी केले आहे.

या बैठकीला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे माजी ता.अध्यक्ष संतोष पाटील गवारे, भारतीय बौद्ध महासभाचे ता. अध्यक्ष जितेंद्र ढवळे,माजी ता. उपाध्यक्ष राणा प्रताप पवळे, माजी.ता. संघटक रणजीत कसबे, माजी.ता. सचिव मनोहर सूर्यवंशी, माजी.ता. प्रसिद्धी प्रमुख भास्कर कदम, माजी ता. उपाध्यक्ष माधव पुनवाड, प्रल्हाद गायकवाड, दिलीप दादा जोंधळे, समता सैनिक दलाचे मेजर संतोष दुंडे, अविनाश कांबळे, मोसिन बागवान, अहेमद पठाण, सुरेश शिरसे सर,राजेश्वर कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, संभाजी कांबळे, सूर्यकांत वाघमारे, प्रदीप सोनकांबळे, धोंडीबा सोनकांबळे, राहुल कदम, अन्य कार्यकर्ते आजी माझी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ▪️


Leave a Comment

error: Content is protected !!