
कळमनुरी : कळमनुरी आणि वसमत, हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली.

वंचित बहुजन आघाडीने विजयाचा निर्धार केलेला असून सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक आणि आरक्षणवादी जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा सोबत आले किंवा सोबत नाही आले, तरीही आम्ही लढत राहू.
नांदेडप्रमाणेच इतर ठिकाणीही युती झाली, तर ती सन्मानपूर्वक, स्वाभिमानाने आणि ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरच होईल.

जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान राखला जाईल आणि कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल, असे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सभेला जमलेली स्वाभिमानी जनता विश्वास देत आहे की, विजय हा आपलाच आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ, राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकार तसेच कळमनुरी आणि वसमत येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.