
श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणाईचा पक्षात ओघ
पनवेल : दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पनवेल महानगरातील कळंबोली शहर विभागात पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि महानगर उपाध्यक्ष आयु. सतिष अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या सोहळ्यात असंख्य तरुण, तडफदार आणि सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कळंबोलीतील प्रभागांत मोठ्या ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
👉 या कार्यक्रमात पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड, उपाध्यक्ष आयु. सतिष अहिरे, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे,
प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, प्रशिक्षक बाळासाहेब मेटांगे सर, संघटक भागुराम भेकरे, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे सर, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन करून पक्षाच्या तत्त्वज्ञानाची दिशा स्पष्ट केली.
नवीन पक्ष प्रवेशित कार्यकर्त्यांची नावे –
संजय पंडित, विजय कुकुर, पूनम रंजवे, ॲड. सुनिता खंदारे, चेतन कारंडे, गणेश रंजवे, भगवान भालेराव, विश्वा रणखांबे, सतीश माने, नितीन पंडित, संतोष साळवे, शहाजी खरात, दत्ता सोकासने, सुरेश गजबे, नामदेव भालेराव, सचिन प्रधाने, शिवाजी प्रधाने, सचिन प्रधाने, राष्ट्रपाल गायकवाड
या सर्व नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कळंबोली शहर विभागात वंचित बहुजन आघाडीचा पाया अधिक भक्कम झाला असून, सामाजिक परिवर्तन आणि बहुजन ऐक्यासाठीचा पक्षाचा झेंडा अधिक उंचावला गेला आहे.