
नांदेड प्रतिनिधी : गजानंद नरवाडे
हदगाव तालुक्यातील मरडगा येथे काही दिवसापूर्वी माननीय अनुसयाबाई बापूराव जाधव हे सरपंच होत्या हदविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असून सरपंच पदाची जागा रिक्त झाली आहे या जागी वार्ड क्रमांक तीन हा वंचित बहुजन आघाडीचा बाल किल्ला असल्याने या वार्डामधून भरघोस मतांनी निवडून आलेल्या मा. सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे सविस्तर वृत्त असे की मरडगा ग्रामपंचायत येथील अंदाजे लोकसंख्या असलेली गाव अडीच हजार असून सदस्य बॉडी नऊची असून यामध्ये महिला आरक्षित ओबीसी हे भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या आणि कालांतराने विद्यमान सरपंच माननीय अनुसयाबाई बापूराव जाधव यांचे निधन झाले असून त्या जागी मा. सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची गावांमधून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व सर्व गावातील गावकरी मंडळी यांच्या वतीने सध्याचे विद्यमान सरपंच मा. सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला आहे पुढील वाटचालीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रमुख उपस्थिती उपस्थिती मंडळ अधिकारी, महाळनर मॅडम, तलाठी नरवाडे सर, ग्रामसेवक कराळे सर, उपसरपंच गजानन नरवाडे, व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते