https://youtu.be/btFHCQMDel8?si=TuOP1Hp4zNvpoouP
मुंबई: येत्या २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होत असलेल्या ऐतिहासिक “संविधान सम्मान महासभे”च्या सर्वांगीण पूर्वतयारीचा आढावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे घेतला.

देशभरातून संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने केलेल्या व्यवस्थांची पाहणी करताना सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत तयारी समाधानकारक असल्याचे सांगितले. सभा यशस्वी व्हावी यासाठी विविध समित्यांची आखणी, नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन याची तत्पर तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, कमलेश उबाळे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजात आंबेडकर |पत्रकार परिषद – संविधान सम्मान महासभा |📍मुंबई