
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे बारूळकर
बारूळ: त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान केंद्र मुखेड च्या वतीने मौजे बारुळ ता कंधार येथे आज एक दिवसीय ध्यानसाधना धम्मपरिचय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे, या शिबिराचे उदघाटन फुले शाहु डॉ बाबासाहेब आंबेडकर विचाराचे धम्मसेवक तथा उद्योजक, आयु किशनराव वनाळे साहेब, डॉ एल, एस, वाघमारे साहेब, मा सरपंच रंजेनाताई आनंदराव वनाळे , यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले आहे,

या वेळी धम्मचारी अचलरत्न, धम्मचारी विमलध्वज, धम्मचारीनी रत्नलोचना, धम्मचारीनी आर्यदीपा, धम्मचारी आनंदगर्भ,ई प्रमुख उपस्थिती होती, शिबिराची सुरुवात , धम्मचारीनी रत्नलोचना ध आर्यदीपा धम्ममित्र शिलाताई चावरे यांनी पुजा घेऊन विधायक वातावरण निर्माण केले,तसेच सोनकांबळे ताई यांच्या मधुर स्वागतगितीने सर्व शिबिरात सहभागी झालेल्या बंधू आणि भगिनिचे स्वागत करण्यात आले ,मुखेड केंद्राच्या वतीने आयु किशनराव वनाळे साहेब, डॉ एल ,एस वाघमारे साहेब, सरपंच वनाळे रंजेना ताई ई,चा सत्कार करण्यात आला, पहिल्या सत्रात धम्मचारी आनंदगर्भ यांनी प्रास्ताविक व आनापानसती ध्यान यावर माहिती व प्रत्यक्ष सराव करून घेतला, धम्मप्रवाहात उतरुया या विषयावर धम्मचारी विमलध्ज यांनी सुंदर असे प्रवचन दिले, मध्यंतरी वनाळे
बारुळकर, वाघमारे परीवारांच्या वतीने गोड भोजेन दान दिले,

दुसऱ्या सत्रात धम्मचारी अचलरत्न यांनी मैत्रीभावन या ध्यानावर सखोल असी माहीत दिली, शिबिरात आलेल्या बंधू आणि भगिनींनी विधायक असे मनोगत व्यक्त केले,या शिबिरास,भोकर, नांदेड, कंधार, नायगाव,देगलुर मुखेड, विविध भागातून 130 बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी,

किशनराव वनाळे साहेब,शांताबाई लक्षुमनराव वाघमारे, आनंदराव वनाळे, माधवराव वाघमारे, आशिष सिरसे, सहदेव वनाळे,सुरज वाघमारे, बालाजी वनाळे, समस्त भिमजयंती मंडळ मौजे बारुळ ई विशेष परिश्रम घेतले,