
नायगाव प्रतिनिधी:
नायगाव येथे साईतीर्थ मंगल कार्यालय येथे 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने स्वाभिमानी निर्धार मेळावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी युथ आयकॉन सुजात आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्याला राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद सर , राज्य सदस्य अविनाश भोसीकर, प्रदेश सदस्य , अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष, शिवाभाऊ नरंगले, मा.जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, महासचिव, श्याम कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष, भिमराव बेंद्रीकर, महानगर अध्यक्ष, गोपालसिंग टाक, महानगर महासचिव, सिद्धोधन कापसीकर , युवकचे जिल्हा महासचिव, अँड वैभव लष्करे, जिल्हासचिव, बालाजी गायकवाड रातोळीकर , यांच्या सहित अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती लाभणार आहे….
या स्वाभिमानी निर्धार मेळाव्यास नायगांव तालुक्यातील समस्त आजी-माजी तालुका शहर शाखा सर्कल वार्ड पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेकडोच्या संख्येने या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे , असे विनंतीपूर्वक आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण चे जिल्हाउपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांनी केले आहे…!