नांदेड येथे स्वाभिमानी निर्धार मेळावा संपन्न प्रमुख उपस्थिती युवा नेते सुजातदादा आंबेडकर


नांदेड :दिनांक 01/11/2025 रोजी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नांदेड दौऱ्याची सुरुवात आज झाली असून, या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून स्वाभिमानी निर्धार मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “आगामी सत्ता बहुजनांच्या स्वाभिमानाने काबीज करू,” असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर आणि ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून अनेक युवकांनी सुजात आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, युवा आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजी. प्रशांत इंगोले तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!