
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालन्यातील वंचित बहुजन आघाडी विभागीय कार्यालय जनसंपर्क कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाचा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला दिनांक 21 रविवार रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे १०४ नगरसेवक आणि ५ नगराध्यक्ष निवडून आल्याने या यशाचा आनंद जालन्यातील वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालया समोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व कार्यकर्त्यांना पेढे भरवण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महीला जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ, जेष्ठ नेते विष्णु खरात, राज आदमाने,तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका महासचिव वैभव वानखेडे,तालुका सचिव गौतम वाघमारे, अरविंद होर्शिळ, मिलिंद सरकटे,संजय उघडे, संतोष मगर, अमोल लोखंडे, संकेत दांडगे, संतोष कासार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.