
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
विजयाचा झेंडा वंचितच जालना शहर महापालिका वर फडवणार
मतदान केंद्र बूथ च्या माध्यमातून जनतेने दिला विश्वास वंचित बहुजन आघाडीने दिलेले उमेदवार हे सोशल इंजिनियरिंग करून शहराचा विकास व जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही उमेदवार उभे केले होते असे गौप्य स्पोट वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना केले आहे .

ते इथपर्यंत च थांबले नाहीत तर त्यांनी इथल्या राजकीय पुढाऱ्यांवर टीका करत घर भरण्याचे काम केले त्यामुळे स्वाभिमानी जनता त्यांना मतदानातून उत्तर देईल आणि त्याचा निकाल उद्या बघायला मिळेलच वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करून शहराचा सामाजिक सांस्कृतिक सलोखा जपून जनतेचे मूलभूत प्रश्न सोडेल असा विश्वास देखली त्यांनी व्यक्त केला . शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात,सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष सुरज सोनवणे,सम्यक विद्यार्थी आंदोलन शहर महासचिव ऍड.सुबोध बुक्तरे, वंचित चे तालूका संघटक राजरत्न अचलखांब,बौधाचार्य दिलीप मगर सह अनेकांची ह्यावेळी उपस्थिती होती.
