भव्य बुद्ध मूर्ती पायाभरणीचा शुभारंभ; तपोवन बुद्धभूमी गोळेगाव येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती


गोळेगाव (ता. लोहा) :

पुज्य भन्ते बोधीधम्मो यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन बुद्धभूमी गोळेगाव येथे भव्य तथागत गौतम बुद्ध मूर्तीच्या पायाभरणीचा शुभारंभ आज बुधवार, दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आला. या पवित्र प्रसंगी परिसरात उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव व भगिनींची उपस्थिती लाभली.

निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या तपोवन बुद्धभूमी गोळेगाव हे ठिकाण भविष्यात एक महत्त्वाचे बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. नांदेड शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थळ शांतता, ध्यान आणि धम्मचिंतनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिका तसेच पर्यटकांनी येथे आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पुज्य भन्ते बोधीधम्मो यांच्याशी थेट संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.

 

नमो बुद्धाय! जयभीम! 🙏🏻💐


Leave a Comment

error: Content is protected !!