स्वाभिमान दिन’ उत्साहात; श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप.


अहमदनगर (१० मे)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकनगर येथील फुले-आंबेडकरनगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येत केक कापून साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

केवळ उत्सव न साजरा करता, विधायक मार्गाने हा स्वाभिमानदिन साजरा करण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरातील विद्यार्थ्यांना वही, पेन आणि कोल्ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले.

https://youtu.be/DyIuLxE9474?si=O7J3yX5ZKGiSk74B

सदर उपक्रमाचे आयोजन सुनीलभाऊ वाघमारे यांच्या खंबीर नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महिला आघाडीच्या रोहिणीताई कटारणवरे, रेखाताई बोर्डे तसेच तालुका संघटक योगेश घोडके यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी:

बाळासाहेब खरात (शाखाध्यक्ष)

राहुल गायकवाड (सचिव)

सुमित कटारणवरे व चेतन गायकवाड

यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रमात मोठी शिस्त पाहायला मिळाली.

मान्यवरांची उपस्थिती:

यावेळी सिद्धार्थ त्रिभुवन, अमोल सोज्वळ, रवि शेलार, दिलीप पारखे, नाना शिंदे, सिद्धार्थ कटारणवरे, रवि शिनगारे, प्रतिक भाटे, जयदीप शिंदे, कुणाल पाळादे, राजू कटारणवरे, सुमित जाधव यांच्यासह महिला आघाडीच्या मारियाबाई कटारणवरे, दिक्षा शेलार, नीता पारखे, भीमबाई उबाळे, बेबी चाबुकस्वार, लक्ष्मी जाधव, शोभा साळवे, मंदाबाई खरात व अनेक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.

“शिक्षण हेच परिवर्तनाचे मुख्य साधन असून, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Leave a Comment

error: Content is protected !!