हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न


हिंगोली | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली येथे आयोजित जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.

युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला हिंगोलीकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्यात सुजात आंबेडकर यांच्या हस्ते शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली.

कार्यक्रमाच्या शेवटी सुजात आंबेडकर यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी विचारांसाठी निष्ठेने काम करण्याचे आवाहन केले.


Leave a Comment

error: Content is protected !!