हिंगोलीत आज वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा


हिंगोली (प्रतिनिधी) — वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा ऐतिहासिक कार्यक्रम संविधान कॉर्नर, महात्मा गांधी चौक, हिंगोली येथे दुपारी 3 वाजता पार पडणार असून, या सभेला पक्षाचे युवा नेते मा. सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सभेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असून, हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात तयारी करत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!