
प्रतिनिधी: सागर लोंढे
इंदापुर जिल्हा पुणे येथील कालठन नंबर.१ या ठिकानी बसवण्यात आलेल्या १४ व्या वित्त आयोग निधीतुन ओपन जिम जेशीबीच्या सहाय्याने समंदीत अधीकाय्रांच्या मदतीने संमंधीत ठेकेदार याने उदवस्त करण्याचे काम या कालठन नंबर.१ या ठिकाणी करण्यास कारणीभुत मा. वसंत शेंडे साहेब कनिष्ठ शाखा अभियंता बांधकाम उपविभाग इंदापुर, संमंधीत ठेकेदार, जेसीबी मशीन मालक ग्रामपंचायत कालठन नंबर.१ चे प्रशासक मा.संजीव कुमार मारकड सो, ग्रामसेवक मा.संजय भोसले सो, मा.शिवाजी राऊत सो, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इंदापुर यांना पाठीशी घालनाय्रा इंदापुर पंचायत समिति चे गट विकास अधिकारी मां.सचिन खुडे साहेब यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवुन त्यांची खाते निहाय चौकशी करुण त्यांच्यासह दोषींवर शासकीय मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४ तसेच BNS कलम ३२४ नुसार संमंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करणार असल्याचे कालठन नंबर.१ चे सामाजिक कार्यकरते आयु. प्रमोदजी चव्हाण यांनी सागीतले आहे.

उपोषण करते हे कालठन नंबर.१ चे कायमचे रहिवासी असुन तरी दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कालठन नंबर.१ यांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगातुन गाव मौजे कालठन नंबर.१ मधील नागरीकांचे स्वास्थ निरोगी रहावे म्हणुन सुमारे २ लाख ६३ हजार किंमतीची जिल्हा परिषद शाळा कालठन नंबर.१ ओपन जिम बसवण्यात आली होती.
परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातुन राबवण्यात येनाय्रा मॉडर्न स्कूल (डिजीटल शाळा) उपक्रमाच्या नावाखाली होत आसलेल्या बांधकामासाठी जिल्हा परिषद बाधकाम विभाग इंदापुरचे कनिष्ठ शाखा अभियंता मा.वसंत शेंडे साहेब यांच्या आदेशाने संबंदित ठेकेदार संबंधित ओपन जिम काढण्यासाठी ग्रामपंचायत चे प्रशासक ग्रामसेवक आणी कर्मचारी यांना कोनत्याही प्रकारची कल्पना न देता तसेच संबंधित विभागाची कोनतीही परवानगी न घेता मनमानी कारभार करत गावामधे बसवण्यात आलेली सुस्थितीत रोज वापरात असलेली ओपन जिम ही जेसीबी मशीन च्या सहाय्याने परस्पर उदवस्त करुण टाकली असल्याबाबत चा तक्रार अर्ज दिला होता.
त्याबरोबर दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या ग्रामसभा ठराव व दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या व्हिडिओ पुराव्यासह दिला होता. परंतु प्रशासक मा.संजीव कुमार मारकड सो, ग्राम सेवक संजय भोसले सो यांनी मा.वसंत शेंडे साहेब कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इंदापुर, संबंधित ठेकेदार व जेसीबी मशीन मालक यांना वाचवण्यासाठी आपले हित संमंद जपत ग्रामसभेने केलेल्या ठरावाला व दिलेल्या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत कारवाई करण्यास टाळाटाळ केली. म्हणुन दिनांक ५ मार्च २०२६ रोजी पंचायत समिति इंदापुरचे गट विकास अधिकारी मा.सचिन खुडे साहेब यांना न्यायाच्या अपेक्षेने तक्रारी अर्ज दाखल केला आणी त्यामध्ये ग्रामसभेमधे केलेल्या ठरावानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती तसेच मागनी पुर्ण न झाल्यास दिनांक १७ मार्च २०२६ रोजी लाक्षणीक उपोषण करत आसल्या बाबत माहिती दिली त्यानुसार संबंधितांवर कारवाई होनं अपेक्षित होत मात्र तसे न करता आम्हाला ग्रामपंचायत कडुन मा.उपअभियंता यांनी एकीकडे दिनांक १२ मार्च २०२६ रोजीचे मा.मुख्याद्यापक जि.प.प्राथमिक शाळा कालठन नंबर.१ चे पत्र व मा. उपअभियंता यांचे १२ मार्च २०२६ जावक क्र.७६/२०२६ या पत्रानुसार खोटी व दिशाभुल करणारी माहिती असणारे पत्र देत उपोषण करते यांची चेष्टा करत उपोषण हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे सदर प्रकरणात कनिष्ठ अभियंता मा.वसंत शेंडे सो, जेसीबी मशीन मालक, ठेकेदार यांचे विरोधात ग्रामसभेचा ठराव आणी व्हिडिओ देऊन सुद्या त्यांची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे व त्यांना पाठीशी घातल्यामुळे मा.प्रशासक संजीव कुमार मारकड सो, मा.ग्रामसेवक संजय भोसले सो, हे जेवढे दोषी आहेत यांना पाठीशी घालनारे मा.शिवाजी राऊत उप अभीयंता व गट विकास अधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी आसल्या कारणाने यांच्यात वैयक्तिक हित संबंध आहेत की काय हा देखील प्रश्न समोर येत शंका येत असल्याने याची खाते निहाय चौकशी करण्यात यावी आणी या प्रकरणातील दोषी असनाय्रांवर शासकीय मालमत्ता नुकसान अधिनियम नुसार कायदेशीर कारवाई करावी.
यासाठी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी मुख्य कार्यालय समोर जिल्हा परिषद पुणे येथे एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करणार आहेत अशी माहिती संबंधित कालठन नंबर.१ चे उपोषण करते सामाजिक कार्यकरते आयु.प्रमोदजी चव्हाण यांनी केले..