महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त व्याख्यानमालेचे नंदापुर येथे तिसऱ्यां पुष्पाचा भव्य कार्यक्रम संपन्न


जालना प्रतिनिधी : दिपक नाटभजन

जालना तालुक्यातील नंदापुर येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वनत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ४ दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रविवार ता. १२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नंदापूर (ता. जि. जालना) यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी लोकशाही समोरील आव्हाने, कारणे व उपाय’ सखोल असे समजेल अशा सोप्या भाषेत जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी ​विशेष अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात हे होते यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास साळवे , सरपंच दत्तु कुरधने, बोरखेडी सरपंच मनोहर म्हस्के मच्छिंद्र खरात, सुरेश वानखेडे,भिमराज खरात, वैभव वानखेडे, उत्तम खरात, शिवाजी खरात प्रकाश खरात,उपसरपंच सौ. सविता कैलास खरात, विष्णु खरात, संजय काळे,बबन खरात, संजय खरात, किशोर खरात, रामकिशन खरात, ज्ञानेश्वर उबाळे पाटील, शिवाजी खरात, प्रविण जाधव, रंगनाथ गवई, अमोल खरात, कृष्णा खरात , पत्रकार दसरथ वाकोडे यांच्या सह ग्राम पंचायत सदस्य व पिरकल्यान जिल्हा परिषद सर्कल मधील हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!