मुंबईत २५ नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा मोठ्या संख्येने उपस्थित रहा.दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

जालना : देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेला २५ नोव्हेंबरची पुन्हा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने संविधान सम्मान महासभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे आहे ‌.२५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्व आहे.या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या धोक्याबाबत इशारा देत समानता,स्वातंत्र आणि बंधुता या मुल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता स्पष्ट केली होती.या इतिहासीक दिवसाचे औचित्य साधत मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी महाराज मैदान दादर मुंबई येथे संध्याकाळी ४ वाजता या सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे,या सभेला संविधान प्रेमी नागरिक फुले शाहू आंबेडकर विचारवंत, मानवतावादी आणि सर्व लोकशाहीवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!