रुई येथील श्री बाबीर विद्यालयाचा इ 10 विचा निकाल 93.28टक्के


प्रतिनिधी सागर लोंढे 

रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.28टक्के जाहीर झाल्या असल्याची माहिती मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली.

शुक्रवार (दि8)रोजी ऑनलाईन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये श्री बाबीर विद्यालयातील यशपाल उदयसिंह पाटील याने 91.65 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक

पटकावला आहे.तसेच मानसी दादा डोंबाळे हिने 89.60टक्के गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळवला

आहे तसेच 87.40टक्के गुण मिळवत उत्कर्षा अजिनाथ मारकड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,पोलीस पाटील अजितसिहं पाटील, मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!