
नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे
शासकीय आश्रम शाळा दुधडच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश
अमरावती येथे पार पडलेल्या स्पर्धेत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत दिनांक ०५ ते ०७ जानेवारी २०२६ दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा दुधड (ता. किनवट) येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत नेत्रदीपक व ऐतिहासिक यश संपादन करून शाळेचा व परिसराचा नावलौकिक राज्यपातळीवर उंचावला आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांवर आपले नाव कोरले.
सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडू

कु. मुक्ताई परमेश्वर इंजेपवाड (मेंडका ता. मुदखेड) हिने १७ वर्षांखालील वयोगटात
१०० मीटर धावणे – सुवर्णपदक
२०० मीटर धावणे – सुवर्णपदक

कु. श्रेया संजय सुदेवाड (मेंडका ता. मुदखेड) हिने तीन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावून उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करत विशेष कौतुक मिळवले.
सांघिक क्रीडा प्रकारातील यश
कबड्डी (१७ वर्षांखालील) – कु. श्रेया संजय सुदेवाड व कु. मुक्ताई परमेश्वर इंजेपवाड यांना सुवर्णपदक
इतर क्रीडा प्रकारातील पदकांची कमाई
लांब उडी – रौप्यपदक
४×१०० मीटर रिले – रौप्यपदक
गोळा फेक – कांस्यपदक
तसेच १९ वर्षांखालील गटातही सुवर्णपदक मिळवून विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीचे फळ मिळवले.
यशस्वी खेळाडूंची नावे
श्रेया संजय सुदेवाड, मुक्ताई परमेश्वर इंजेपवाड, श्रीराम संजय सुदेवाड, श्रीओम परमेश्वर इंजेपवाड, कविता माधव माझळकर, लक्ष्मी माधव माझळकर, पल्लवी दत्ता वानोळे, सुजाता नामदेव माझळकर, पल्लवी शिवाजी गुव्हाडे, पुण्यरथा सोनबा कुमरे, वैष्णवी जगदीश पेंदोरे, आशाबाई पुंडलिक अंभोरे, सुजाता रजनीकांत चव्हाण, गायत्री रजनीकांत चव्हाण, विशाल शाहुजी घोटेकर आदी विद्यार्थ्यांनी या यशात मोलाचा वाटा उचलला.

मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान
या उज्वल यशामागे कोच श्री परमेश्वर धोंडीबा इंजेपवाड, क्रीडा शिक्षक श्री राहुल आपसनवाड, श्री सचिन शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री राजेंद्र शैळके, मुख्याध्यापक मा. प्रल्हाद चामे सर, श्री सतीश दासरे सर व डॉ. अशोक झुंजारे सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
भव्य गौरव व सत्कार समारंभ
या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मेंडका येथे भव्य गौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामेश्वर बोदमवाड सर होते.

मान्यवरांची उपस्थिती
उद्योजक दत्ता बोदमवाड, उपसरपंच नारायण निखाते, पोलीस पाटील गोविंद वसुरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत निखाते, माजी सरपंच गंगाधर दासरे, माजी उपसरपंच रफिक शेख, प्रा. शिवाजी बोदमवाड, शंकरराव पामलवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य महाजन सुदेवाड, तलाठी विश्वनाथ बोदमवाड, नांदेड पोलिस संतोष घोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगांबर दासरे सर यांनी केले तर तुकाराम मनुरे यांनी आभार मानले.
पूर्ण विडिओ 👇
यावेळी गंगाधर दासरे यांनी खेळाडूंचा विशेष सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात रामेश्वर बोदमवाड सर यांनी विजयी खेळाडूंना क्रीडा किट बक्षीस देण्याची घोषणा करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या यशामुळे शासकीय आश्रम शाळा दुधडने क्रीडा क्षेत्रात नवे शिखर गाठले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




