भक्तीमय वातावरणात होणार पूजनाचा सोहळा. पैनापल्ले परिवाराससह गावकरी सज्ज.
नांदेड जि.प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर
पेठवडज:धाकटी पंढरी संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांचे मक्रत संक्रात पूर्व दिवशी भोगी च्या मंगल पर्वावर मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी कल्हाळी येथे एका भक्तीमय आणि ऐतिहासिक क्षणाचा सोहळा संपन्न होणार आहे याचे साक्षीदार भाविक भक्त होणार आहेत.
कार्यक्रम श्रीगुरूंचे पूजन आणि श्रीशा सूर्यकांत पैनापल्ले हिचा वाढदिवस यामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. पैनापल्ले कुटुंबाच्या राहत्या घरी श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या पावन चरणांचा लाभ होणार आहे. या निमित्ताने महाराजांची विधिवत पूजा आयोजित करण्यात आली असून संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगाला विशेष ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. यापूर्वी पैनापल्ले कुटुंबातील ज्येष्ठ रामराव पैनापल्ले (वडील) यांच्या हस्ते पाचवे गुरु श्री एकनाथ महाराज यांची पूजा पार पडली होती. त्यानंतर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा गुरु-परंपरेचा हा पवित्र योग जुळून येत असून सातवे गुरु श्री नामदेव एकनाथ महाराज यांचे चरण पुन्हा एकदा या कुटुंबाच्या घरी लाभणार आहेत.
श्री एकनाथ नामदेव महाराजांचे कल्हाळी येथील परिसरात पुष्पवृष्टीने व भक्तीभावाने स्वागत करण्यात येणार असून त्यांचे आगमन मोठ्या थाटामाटात होणार आहे. महाराजांच्या दर्शनासाठी व आशीर्वादासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसाचे औचित्य, गुरुचरणांचा लाभ आणि परंपरेचा वारसा यामुळे हा दिवस पैनापल्ले कुटुंबासाठी अत्यंत मंगल व अविस्मरणीय ठरणार आहे.
ही पूजा केवळ धार्मिक विधी न राहता पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या श्रद्धेची, संस्कारांची आणि गुरु-शिष्य परंपरेची साक्ष देणारी ठरणार असून संपूर्ण कल्हाळी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण करणारी आहे.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी तीर्थ प्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पैनापल्ले परिवारा तर्फे करण्यात आले आहे.