मुदखेड येथे वादळी पावसामुळे बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राचे मोठे नुकसान; मदतीचे आवाहन


मुदखेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे 

मुदखेड येथील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार मुदखेड येथे दि. ०३/०६/२०२६ ते दि. १३/०६/२०२६ या कालावधीत दहा दिवसीय बालसंस्कार श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एकूण १३ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांना तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र विचारांचे, नैतिक मूल्यांचे व धम्मसंस्कारांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, शिबिर सुरू असतानाच मुदखेड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राच्या विहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विहाराच्या पत्र व त्याला लावलेले लोखंडी गंगल हे उडुन गेले आहे अन्य भागांचे नुकसान झाल्याने शिबिराच्या आयोजनावरही परिणाम झाला आहे.

यासंदर्भात मुदखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करावी, पंचनामा करून शासनाकडून योग्य तो मोबदला व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व लोकप्रतिनिधींनीही विहाराची पाहणी करून आवश्यक मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, समाजातील सर्व धम्मबंधू-भगिनींना देखील मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. “फूल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेतून आर्थिक धम्मदान देऊन बुद्ध विहाराच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुज्य भंते गगन बौद्धी यांनी केले आहे.

 


Leave a Comment

error: Content is protected !!