सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


उस्माननगर (ता. कंधार) येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत आज थोर समाजसुधारिका व स्त्रीमुक्तीच्या जननी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त करून त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत साकारलेली रूपे.

यामध्ये श्रेया कांबळे, आनन्या हराळे आणि गौतमी कांबळे यांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सहभाग घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे बीज बालमनात रुजावे, शिक्षणाचे महत्त्व समजावे आणि सामाजिक समतेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले


Leave a Comment

error: Content is protected !!